भैरवी कुमावत ला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक
वाघळी...भैरवी कुमावतचे अभिनंदन करतांना प्राचार्या जयश्री सूर्यवंशी
गणपूर(ता चोपडा)ता 19: चाळीसगाव येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व.संदीप चव्हाण राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.भैरवी कुमावतला उत्तेजनार्थ पारीतोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील अनेक महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. कु.भैरवी कुमावतचे संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी,प्राचार्या सौ.जयश्री सूर्यवंशी,शिक्षक व शिक्षीकांनी अभिनंदन व कौतुक केले.....
..
