मयताच्या टाळू वरचे लोणी खाणारे कोण
♦️मजरे हिंगोणा येथे मयताच्या नांवावर ग्रामपंचायतने पैसे काढल्याचा भयावह प्रकार ; सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी
चोपडा,दि.२० (प्रतिनिधी) --- तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराजचे आलेले पेमेंट मयताच्या नावावर काढून मोठा भ्रष्टाचार केला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या इसमाना मयत होवून पाच ते दहा वर्ष होऊन गेली आहे अश्या इसमाच्या नावाने सर्रास पेमेंट काढले जात असून देखिल हे पैसे कोणाच्या खिश्यात जात आहे.याचा जिल्हा अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन हे प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीत जो ही असेल त्यांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
येथील पंचायतराज मध्ये आलेल्या कामात मयत पोपट यादव पाटिल हे 16/10/2009 ला मयत झाले आहेत यांचा नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022-- 23/R/64 ह्या व्हाऊचरने दि.08/2/2023 रोजी 5726/- रुपये रोख काढले आहेत. तसेचव्हाऊचर OWN/2022-- 23/R/53 ह्या व्हाऊचरने रोख 5025/- रुपये काढण्यात आले आहेत.असे एकूण 10751/- रुपये रोख काढण्यात आले आहे. तसेच पितांबर दौलत धिवर हे 19/9/2014 ला मयत झाले आहे त्यांचा नावे व्हाऊचर क्रमांक OWN/2022--23/R/2 यातून 1800 /- रोख काढण्यात आले आहे. OWN/2022--23/R/3 हया व्हाऊचर द्वारें 2306/- रुपये रोख काढण्यात आले आहे. व उत्तमराव बाबूराव पाटील हे दि.5/4/2013 ला मयत झाले आहेत ह्या इसमाच्या नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022--23/R/20 ह्या व्हाऊचर द्वारे 3100/- रुपये रोख काढण्यात आले आहे. असे दहा वर्षे होऊन गेले आहेत यांच्या नावाने पेमेंट काढले जात आहे तर असे किती व्हाऊचर तयार करण्यात आले आहे आणि किती पेमेंट काढण्यात आले आहे.
याबाबत विषय गुलदस्त्यातच आहे. जनसामान्य जनता तर म्हणते आहे की, ह्या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर लाखों रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो भ्रष्टाचार करणाऱ्या जो कोणी असेल त्याला वरीष्ठ अधिकारीनी पाठिशी न घालता संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी होत आहे. वरील सर्व माहिती पुरविण्याचे काम प्रसाद सुधाकर सुर्यवंशी या सामाजिक कार्यकर्त्यांने केले आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले आहे आणि जिल्हाधिकारी यांच्या सुद्धा दि.27/9/23 ला पत्र दिले आहे मात्र साधी चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे अश्या अफरातफर करण्याऱ्या वर वचक बसत नाही. आणि दिवसेंदिवस हे लोक धीट होत जातं असतात. तरी सखोल चौकशी व्हावी असे गावातील नागरिकांचे मत आहे. मजरे हिंगोणा या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण हे चक्क चोपडा येथील विश्रामगृहावर सुरू होते त्यावेळी देखील काही वृत्तपत्रानी बातम्या लावल्या होत्या मात्र त्यावेळेस अधिकाऱ्यानी संबंधित इसमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हाधिकारीनी स्वतः लक्ष घातले तर लाखो रुपायांची अफरातफर निघू शकते. आणि त्यांच्या कडून वसूल करून संबंधितांना वर गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे.














