पुन्हा गावठी बनावटीचे कट्ट्यांसह तिघांना अटक..१ लाख ११हजारांचा मुद्देमाल जप्त.. ग्रामीण पोलिसांची कारवाई

 

पुन्हा गावठी बनावटीचे कट्ट्यांसह  तिघांना अटक..१ लाख ११हजारांचा मुद्देमाल जप्त.. ग्रामीण पोलिसांची कारवाई 


चोपडा दि.१८(प्रतिनिधी ) तालुक्यातील उमर्टी भागात पुन्हा गावठी कट्ट्यांसह तिघांच्या मुसक्या आवळण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

दि. १७/१०/२०२३ रोजी २१.४० वाजता पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ,तिन इसम आपले कब्जात गावठी बनावटीचे कट्टा व जिवत काडतुस असे उमर्टी ता.वरला जि.बडवाणी येथुन सत्रासेन मार्गे चोपडा कडे दोन मोटरसायकल वर येत आहे.तेव्हा पोलीस स्टेशनचे  पोहेकॉ/राकेश पाटील, पोकॉ रावसाहेब एकनाथ पाटील तसेच होम/प्रदीप शिरसाठ यांसह पोलीस स्टॉफ हे कारवाई कामी रवाना झाले असता त्यांना सत्रासेन गावाचे पुढे असलेल्या तिन फाट्याजवळ  संशयित हे येतांना दिसले तेव्हा त्यांना पोलीसांनी थांबवुन विचारपुस केली असता सदर इसमाचे नावे १) मनिष सम्राट थांबेत वय १९ रा. प्रिप्रांळा ता.जि.जळगाव २) नितीन प्रमोद बोरसे वय १९ रा.इद्रनिल सोसायटी खोटेनगर ता. जि.जळगाव ३) भायदास लालचंद पावरा वय २० रा.गौ-यापाडा ता.चोपडा ह.मु.पुणा हॉटेल जळगाव असे सांगितले तसेच त्यांना सदर भागात कशासाठी आले बाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांची अंगझडती घेतली असता मनिष सम्राट थाबेत याचे कमरेला एक गावठी कट्टा मिळुन आला तसेच त्याचे खिशात दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने तिघांना पोलीसांनी तिघांना जेलची हवा दाखविली.  सदर इसमाजवळ एकुण १,११,०००/ रु किमतीचा मुद्देमाल त्यात एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुस दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले . पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर याचे आदेशान्वये सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/ गणेश मधुकर पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने