खबरदार ..!आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या डोळे विस्फारून टाकणाऱ्या विकास कामांना विरोध केला तर ..नाहीतर मांडी ठोकून कोट्यावधींचे कामे आणून दाखवा आम्ही तुमचे डीजे वाजवून स्वागत करू .. बाजार समिती सभापती नरेंद्र पाटलांचे आव्हान
चोपडा,दि.१८ ( प्रतिनिधी महेश शिरसाठ) --* शिवसेनेचे लोकप्रिय आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या अथक परिश्रमाने हजारो कोटी रुपयांचे विकासकामे सुरू आहेत . त्यामुळे विरोधी पक्षाची मंडळी राजकीय भवितव्य संपुष्टात येण्याच्या भितीने कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना आडमुठेपणा करून अडथळा निर्माण करण्याचा प्रताप करीतआहेत .अश्या विघ्नसंतोषी विरोधकांच्या बाबतीत जनतेत प्रचंड संतापाची लाट सुरू झाली आहे.अशा या विरोधाभासी फुकट पुढारी द्वेष भावनेने बरबटलेल्या लोकांचे कलूषित हेतु मुळीच साध्य होणार नाहीत याची दखल जनताच घेत असून विकास कामे मिळवण्यासाठी दिवसाची रात्र अन् रात्रीचा दिवस कसा करावा लागतो आणि काय झिझावे लागते हे या शेत शिवाराच्या आतच काम करणाऱ्या राजकीय डिंग्या मारणाऱ्या बहाद्दरांना काय कळेल ? असा प्रश्न करीत ..मांडी ठोकून कोट्यावधींचा निधी आणून दाखवा.. शक्य न झाल्यास राजकिय संन्यास ठोकून खाट टाकून आराम करावा असा सल्ला देत विकास कामाला अडथळा आणू पाहणाऱ्यांचीआता गय केली जाणार नाही वेळ पडल्यास कायद्याच्या बडगा उगारु असा निर्वाणीचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेतुन दिला.
ते पुढे म्हणाले की, विकास कामांसाठी निधी मागणाऱ्यांची गर्दि असते.अन् ज्या गावाला निधी मिळाला ते त्या गावाचे भाग्यच समजले जाते. मात्र कोट्यावधींचा निधी मिळाल्यावर कामं करू देणार नाही असं म्हणणाऱ्यांची दादागिरी जनता मुळीच खपवून घेणार नाही . जिवाचे रान करून कार्य सम्राट आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा .चंद्रकांत सोनवणे हयांनी स्वतःहून करोडो रुपयांचा निधी आणून जनसेवा बजावत आहेत तसेच तालुक्यात विकास कामे हे सर्व खेड्यापाड्यात सुरू आहेत. ही कामाची पावती पाहून आमदारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढु लागल्याने विरोधकांची धडकी भरली आहे. परिणामी वर्डी गावात मंजूर कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याला अडथळा निर्माण करण्यासाठी विरोधाकांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. तो आम्ही हाणून पाडू असा इशारा गावकऱ्यांनी दिला असून अशा चांगल्या कामास विरोध करण्याची विरोधकांची हिंम्मत कशी होते ? असा सवालही केला आहे . तरी जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही यापुढेही १००कोटींची विकास कामे लवकरच सुरू होतील ते विकास कामे झपाट्याने होतील आणि अशा डरपोक विरोधाने ते कामे थांबतील हा सडका विचार डोक्यातून काढून फेका नाही तर जनताच आपल्याला चांगलाच ठेंगा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी मारला.
हातेड- गलवाळे येथे ही विकास कामाला विरोध केला होता. चांदसणी-- कमळगाव येथेही तोच प्रकार आणि आता वर्डी येथे असाच प्रकार म्हणजे तालुक्याचा विकास ठप्प करायची मनिषा आहे की काय?. इतका निधी नगरविकास मंत्री व विधानसभा अध्यक्षपदावर असतांना अरूणभाई गुजराथी हे देखिल आणू शकले नाहीत मात्र आता फक्त आमदार असतांना आमदार लताताई सोनवणे यांनी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे या दोघाच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे .जवळपास पाचशे कामाचे उद्घाटन ते करणार आहेत . अजून तर शंभरच कामांचे उद्घाटन भूमिपूजन झालेले आहे. तितक्यातच विरोधकांची पोट दुखी सुरू झाली आहे. आणि जेंव्हा पाचशे कामाचे उद्घाटन होईल तेंव्हा हे विरोधक अजून काय प्रकार करतील हा विचारच सोडा. हे राजकीय स्टंट म्हणून विरोध करत आहेत. त्यांच्या अयोग्य विरोधाला आम्हीही आमच्या प्रमाणे उत्तर देऊ आणि त्यांच्या या विरोधाला न घाबरता जे काम जेथे मंजूर असेल त्याच ठिकाणी होईल. विरोधकांनी डोळ्यात अंजन घालून नगरपालिके मार्फत कस्तुरबा विद्यालया पासून तर बायपास पर्यंत झालेल्या रस्त्यांचे कामाची अवस्था बघावी. तिथे त्या कामाचे कोणी कसे काय बोलत नाही असा सवाल देखील नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
यावेळी उपसभापती एम. व्हि. पाटील, संचालक विजय पाटील, गोपाल पाटील, राजेंद्र पाटील,नितीन पाटील, कैलास बाविस्कर, ऍड.शिवाजी पाटील,नाना आहिरे, शिवाजी कोळी, रमाकांत देवराज,ज्ञानेश्वर अहिरे, संदीप धनगर, आदी उपस्थित होते
