पृथ्वीच्या सर्कल मध्ये आम्ही जगत असतो पंरतु वैज्ञानिक मात्र चांद सीताऱ्यात जीवन जगतात : अरूणभाई गुजराथी
चोपडा,दि.१८ (प्रतिनिधी ) --- आम्ही राजकारणी पाच पी मध्ये जगतो आणि ते पाच पी म्हणजे पोझिशन,(Position),पॉवर (Power),प्रॉपर्टी (Property)प्रोफेशनल (Professional), प्रॉफिटेबल (Profitable) परंतु तुमच्या सारख्या वैज्ञानिक हे पाच डी मध्ये जगत असतात त्यामुळेच इतक्या मोठ्या स्थाना पर्यंत पोहचत असतात ते पाच डी म्हणजे डिमेनसीओन्स (Dimensions) डिओशन,(Devotion),डिसिपीलीन,(Discipline),डेडीकॅशन(Dedication) , डीफरेंट (Diffrent ), असते म्हणून ते उच्चपदस्थ होत असतात. त्याची वर्षानुवर्षेची मेहनत असते तेव्हाच ते चंद्रयान मध्ये यशस्वी झाले. आम्ही पृथ्वीच्या सर्कल मध्ये जगत असतो पंरतु वैज्ञानिक मात्र चांद सीताऱ्यात जीवन जगत असतात. मी चाळीस वर्षा पासुन राजकारणात आहे परंतू आज पर्यंत कोणा वैज्ञानिकाचा सत्कार समारंभचा कार्यक्रमात मी गेलेलो नाही. आज प्रथमच ही संधी भारतीय जैन संघटनाने करून दिली..त्याबद्दल मी भारतीय जैन संघटनेचा ऋणी राहीन ..असे स्पष्ट मत माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले .
भारतीय जैन संघटनाने येथील बोथरा मंगल कार्यालयात गुणवंत विध्यार्थ्याचा सोहळा तसेच तालुक्यातील हातेड येथील जैन समाजाचे संघपतीचे गुलाबचंद देसर्डा यांचे सुपूत्र व चंद्रयांन -३ मध्ये मोलाची कामगिरी करणारे, इसरोचे वैज्ञानिक संजय
देसर्डा यांचा विशेष सत्काराचे नियोजन भारतीय जैन संघटनाने केला होता. यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, यांच्या सारख्या वैज्ञानिकामुळे चंद्रावर जाणे देखिल स्वस्त झाले आहे आपण जळगाव साठी गाडी केली तरी देखिल १२ रुपये किलोमीटर म्हणतो आणि चंद्रावर जाण्यासाठी फक्त ७ रुपये किलोमीटर प्रमाणे पैसे लागले.हे फक्त यांच्या सारख्या वैज्ञानिकामुळेच होय. तंत्रज्ञान युग इतके विकसित झाले आहे. त्यामुळे मनुष्याला चंद्रावर जाने देखील सोपे झाले आहे.गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने केले पाहिजे. असे ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
सर्व प्रथम मंगलाचरण मोक्षिता बोरा ,व स्वागतगित यशिता बरडीया, सृष्टी राखेचा, आदिती जैन, यांनी म्हटले तर स्टेजवर प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण कोचर, भारतीय जैन संघटनाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश छाजेड ,संघपती गुलाबचंद देसर्डा संघपती प्रदीप बरडीया, विभागीय उपाध्यक्ष लतीश जैन, तालुका अध्यक्ष निर्मल बोरा, महिला अध्यक्ष सौ.मानसी राखेचा, आदी उपस्थित होते.
यावेळी भारतीय जैन संघटनाचे प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले तसेच गुणवंत विध्यार्थ्याचा अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कांताई नेत्रालयचे व्यवस्थापक युवराज देसरडा, भाऊसो एस. एस. पाटिल विद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.सोनवणे, रोटरीचे अध्यक्ष चेतन टाटीया,समरथ युवा परिषदचे राज्य अध्यक्ष निखिल बरडीया,अश्या विविध पदाधिकारी व भारतीय जैन संघटनाला नेहमी सहकार्य करणाऱ्याचे सत्कार करण्यात आले. व विशेष सत्कार वैज्ञानिक संजय देर्सडा यांच्या सत्कार करण्यात आला. संजय जैन यांना सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
संजय जैन यांचा परिचय व सन्मान पत्राचे वाचन चेतन दर्डा यांनी केले. यावेळी प्रकाश छाजेड, प्राचार्य अरुण कोचर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. वरील सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव गौरव कोचर, कोष्याध्यक्ष अभय ब्रम्हेचा, उपाध्यक्ष मयंक बरडीया,जिल्हा कार्यकारणी सद्स्य दर्शन देसरडा, आदेश बरडीया,क्षितिज चोरडिया, श्रेणिक रूनवाल,आकाश जैन,चेतन टाटिया, दिनेश लोडाया, आनंद आचलिया,कुशल बूरड, प्रवीण राखेच्या, शुभम राखेच्या, राहुल राखेचा, सौ.योगिता बोथरा,सौ.पूजा बोरा,सौ.अंकिता दर्डा,सौ.अंजली बरडीया, सौ.सपना टाटिया,सौ पूजा राखेचा, सौ.अर्चना बोरा, सौ.त्रिशला जैन, आदिंनी मेहनत घेतली
