प्राथमिक-माध्यमिक शिक्षक संघटना व संस्थाचालक महामंडळातर्फे चोपडा तहसील कार्यालयावर २३रोजी धरणे आंदोलन
चोपडा दि.१७(प्रतिनिधी) चोपडा तहसील कार्यालयावर 23 ऑक्टोबर रोजी प्राथमिक-माध्यमिक संघटनांचे तसेच संस्थाचालक महामंडळाचे संयुक्त धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे
*महाराष्ट्र शासनाच्या कंत्राटीकरण व शाळा खाजगीकरण विरोधात महाराष्ट्र माध्यमिक मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर संघ (फेडरेशन) व इतर सहयोगी संघटनानी राज्यात प्रभाविपणे प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कार्यालया समोर ""धरणे आंदोलन""करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने चोपडा तहसील कार्यालयावर दिनांक-23ऑक्टोबर 2023 वार-सोमवार रोजी दुपारी 3 ते -5 या वेळेत सर्व माध्यमाच्या खाजगी, जि.प प्राथमिक,अनुदानित आश्रमशाळा,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनाच्या वतीनेधरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे.*
*तरी तालुक्यातील सर्व संस्थाचालक पदाधीकारी,माध्यमिक,उच्च माध्यमिक,जि.प.-खाजगी प्राथमिक,अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन चोपडा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघ व इतर सर्व जि. प.-खाजगी प्राथमिक, अनुदानित आश्रमशाळा विभागाच्या सहयोगी संघटना. तसेच संस्थाचालक,विद्यार्थी संघटनेने केले आहे
