त्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले पण मुख्य संशयित सूत्रधार मोकाट कसा ? राकॉ. उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांचा सवाल
*चोपडा दि.१८(प्रतिनिधी)* अँटी करप्शन चे अधिकारी यांनी वेट अँड मेजरमेंट च्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले त्यात फक्त दोन अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले *परंतु करता करविता संशयित जिल्ह्याच्या मुख्य अधिकारी याला मात्र सस्पेंड का करण्यात आले नाही?* असा प्रश्न राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी उपस्थित केला आहे
काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील वेट अँड मेजरमेंट (वैध मापन शास्त्राचे) अधिकारी श्री एस आर खैरनार व विवेक झरेकर हे रावेर येथे व पहूर पाचोरा येथे अँटी करप्शन च्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.दोन्ही अधिकारी इन्स्पेक्टर लेव्हलचे असल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून घरी पाठवण्यात आले पण ज्या अधिकाऱ्याने यांना त्या ठिकाणी कारवाईसाठी व लाच घेण्यासाठी पाठवले होते असे संशयित जळगाव जिल्ह्याचे मुख्य नियंत्रक बाळासाहेब गंगाधर जाधव यांना अजून पर्यंत निलंबित करण्यात आलेले नाही व त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुद्धा करण्यात आलेली नाही असा आरोप अमृतराज सचदेव यांनी केला आहे.
श्री.सचदेव यांनी महाराष्ट्र राज्याचे वैध मापन शास्त्राचे सुप्रीटेनडनट (कंट्रोलर) श्री सुरेश कुमार मेकला यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही त्यांनी काहीही पाऊल उचलले नाही यामागे काही तरी गोलमाल असावा का असा संशय व्यक्त करत याप्रकरणी खोलात जाऊन ज्या अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण हालचाली केलेले असतील तर त्यांच्या मालमत्तेची व कार्यपद्धतीची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे असेही सचदेव यांनी म्हटले आहे.
