शेतकरी बांधवांनो.!ई पिक पाहणी फायद्याची २५ सप्टेंबर शेवटी संधी.. अनवर्दे खुर्द परिसरात सर्कल व तलाठी बांधावर

 

शेतकरी बांधवांनो.!ई पिक पाहणी  फायद्याची २५ सप्टेंबर शेवटी संधी.. अनवर्दे खुर्द परिसरात सर्कल व तलाठी बांधावर

चोपडा दि.२३(प्रतिनिधी):
शेतकरी बांधवांच्या हितासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता ई पिक पाहणी  करणे अत्यावश्यक असून शेवटची मुदत २५ सप्टेंबर पर्यंत असल्याने  मुदतीत ई पिक पाहणी करून  घ्यावी असे आवाहन हातेड, अनवर्दे खुर्द बुधगाव परिसरातील  शेतकऱ्यांना मंडल अधिकारी रवींद्र माळी व तलाठी गजानन पाटील यांनी केले आहे.

*माझी शेती माझा ७/१२ मीच लावणार माझा पिकपेरा* या संकल्पनेतुन शासनाने ई पिक पाहणी प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्रात  राज्यभर करण्यात आली आहे.ई पिक पाहणी पुर्वी फक्त तलाठी मार्फतच केली जात असे परंतु सामान्य शेतकरी बांधवांना त्यांच्या हितासाठी व हक्कासाठी ई पिक पाहणी एप्लीकेशन द्वारे पिक पाहणीची सुविधा देण्यात आली आहे.चोपडा तालुक्यातील सर्व तलाठी याबाबत वेळोवेळी सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत जावुन ई पिक पाहणी एप्लीकेशन बद्दल प्रचार , प्रसिद्धी व प्रशिक्षण देत आहेत. त्याच अनुषंगाने सर्कल रविंद्र माळी व तलाठी गजानन पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन ई पिक पाहणी चे महत्व व प्रशिक्षण  शेतकरी बांधवांना दिले.

*ई पिक पाहणी करण्याची आवश्यकता का आहे याचे काही कारणं  त्यांनी समजावून सांगितले ती अशी,
१) पिक विमा साठी लागणारा डाटा विमा कंपनी थेट ई पिक पाहणी एप्लीकेशन वरुन घेणार असलेने ई पिक पाहणी न नोंदवल्यास अडचण येवु शकते
२) पि एम किसान योजनेत शेती करत असल्याचा पुरावा पिकपेरा लावल्याशिवाय तयार होत नाही.
३)कर्ज ,बोजा ,पिक कर्ज यासाठी देखील पिक पाहणी नोंदवणे आवश्यक आहे.
४) दुष्काळ,अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पंचनामा करण्यासाठी देखील ई पिक पहाणी मधील डाटा वापरला जाणार आहे.
*त्याचप्रमाणे विविध शासकीय योजना , अनुदान वाटपासाठी ई पिक पाहणी चा डाटा महत्त्वाचा ठरणार आहे तरी पिकपाहणीची अंतिम मुदत 25 सप्टेंबर २०२३ असलेने तातडीने ई पीक पाहणी नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने