गणेश विसर्जन मिरवणुकीत चोपड्यात ऑनड्यूटी पोलिसांसाठी शारदा मॅथ क्लासेस व रोटरी क्लबची प्रेमाची शिदोरी
चोपडा दि.२४(प्रतिनिधी)महाराष्ट्रात सुरू झालेला श्री गणेशोत्सव आता अवघ्या जगाचा झाला आहे .गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे उत्साहाला उधाण आणि तसंच बाप्पाला निरोपही तेवढ्याच जोशात दिला जातो. या जोशात रंगाचा भंग होऊ नये म्हणून पोलीस ,होमगार्ड आणि सोबत एस. आर. पी . व इतर सर्व बंधू-भगिनींचा खडा पहारा साऱ्या चोपडा शहरात असतो. स्वतःच्या गरजा, दुखणं खूपणं , घरचा गणपती सारे बाजूला सारून सदरक्षणाय खलनिग्रणायसाठी कर्तव्य बजावणारे हेच सारे बांधव सामान्य जनतेसाठी खरे विघ्नहर्ता असतात . त्यांच्या कर्तव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि शारदा maths परिवार, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 500 पॅकेट शिरा आणि पोहेचा स्वादिष्ट नाश्ता व सोबत पाण्याच्या बॉटल चे वितरण करण्यात आले.
शारदा maths परिवाराच्या विद्यार्थ्यांनी सर्व पॅकिंग आणि वितरणाची जबाबदारी सांभाळली. यात विद्यार्थिनींचा सहभाग हा उत्स्फूर्त व लाक्षणीय होता .
चोपडा विभागाचे उपअधीक्षक श्री कृषिकेश रावले आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय श्री के के पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. चोपडा रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.