सूरमाज फाउंडेशनमार्फत गणपती विसर्जन मिरवणुकीत पाणी व नाष्टा वाटप
चोपडा दि.२४(प्रतिनिधी) गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सूरमाज फाऊंडेशनने 500 पाण्याच्या बाटल्या, नाश्ता व काही फळे गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवारी 23/09/2023 ला वाटप केली. यावेळी पोलीस निरीक्षक कांतिलाल के पाटिल , पीएसआय अजीज साल्वे , घनश्याम तांबे , संतोष चौहान , हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमाज फाउंडेशन), मुराद भाई सिकलीगर, अबुल्लैस शेख, जियाउद्दीन काजी साहेब, डॉ. एम. डी. रागीब साहेब, शोएब शेख, इम्रान भाऊ पलंबर, शुभम भाऊ, डॉ. मोहम्मद जुबेर शेख आणि सूरमाज फाऊंडेशनच्या सदस्य उपस्थित होते.
हे कार्य पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य केल्याबद्दल सुरमाज फाऊंडेशनने पोलीस कर्मचारी संतोष पारधी, विलेश सोनवणे , तोर दादा, मिलिंद सपकाळे, जितेंद्र सोनवणे, संदीप भाऊ आणि पोलीस प्रशासन यांचे आभार मानले.