चोपडा तालुका कोळी महासंघातर्फे आ.रमेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप
चोपडा दि.१६(प्रतिनिधी)कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेश दादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त चोपडा तालुका कोळी महासंघातर्फे उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रम कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष विजय बाविस्कर ,सचिव अनिल कोळी, उपाध्यक्ष गजानन कोळी यांच्या नेतृत्वाखालील घेण्यात आला.याप्रसंगी जगन्नाथ बाविस्कर, मगन बाविस्कर सर , माजी नगरसेवक कैलास सोनवणे , भाईदास कोळी ,गोपाल बाविस्कर, भरत पाटील, साहेबराव कोळी, सुनील कोळी, अभिषेक सुर्यवंशी, बाळू कोळी, विशाल कोळी ,भरत कोळी, देवेंद्र कोळी, प्रशांत कोळी आदी उपस्थित होते.
