'आयुष्यमान भव' योजनेचा चोपडयात प्रारंभ
चोपडा , ता. १६(प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत तालुक्यात आयुष्यमान भव मोहिमेचे उदघाटन शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन ह्या उपस्थितीत होत्या.
या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. वैशाली महाजन, डॉ. नरेश पाटील, डॉ. मनोज पाटील व जळगांव येथील नेत्रविभाग, अस्थीविभाग, मानस उपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक वर्ग 1 डॉ. सुरेश पाटील, डॉ. पवन पाटील,डॉ. सागर पाटील, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. तृप्ती पाटील मॅडम, डॉ. सपना पाटील मॅडम, डॉ. चन्दहास पाटील, डॉ. दिनेश सोनवणे, श्री. संगीता शिंगारे मॅडम अधिसेविका, उषा कावडकर परिसेविका, ज्योती पाटील, संगीता शिंदे,रेखा धनगर, मीना राठोड, मानसी धनगर, शितल वडगे, मीना बारेला परिचारिका व आरोग्य सेविका सुरक्षारक्षक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.उपस्थित होते...
तालुक्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत 'आआयुष्यमान भव' मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये अबाल वृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे. आयुष्यमान आपल्या दारी या उपक्रमाद्वारे तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थीची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान गोल्डन कार्ड चे वितरण
चोपडा : आयुष्यमान भव योजनेचा फीत कापून प्रारंभ करताना साधना महाजन. शेजारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ. प्रशांत महाजन करण्यात येणार आहे. हे कार्ड असलेल्या लाभार्थीना नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे,तालुक्यातील नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा शिबिराच्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

