ललित कला केंद्राचा 31 वा वर्धापन दिन साजरा
चोपडा,दि.१७(प्रतिनिधी):- भगिनी मंडळ, चोपडा संचलित,*ललित कला केंद्राचा " 31 वा " वर्धापन दिन* नुकताच साजरा करण्यात आला.वर्धापन दिनानिमित्त *स्केचिंग व लँडस्केप* या आउटडोर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशन,ए.टी.डी. प्रथम वर्ष व ए.टी.डी. द्वितीय वर्ष तसेच जी. डी. आर्ट पेंटिंग च्या सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त पणे भाग घेतला. विविध घटकांचे रेखांकने व लँडस्केप तसेच ठळक वस्तूंचे चित्रण केले. प्राचार्य सुनील बारी, प्रा. विनोद पाटील व प्रा. संजय नेवे यांनी नवीन विद्यार्थ्यांना पेन्सिल कशी पकडावी व किती वेळेत रेखांकन पूर्ण करावे त्याचे प्रात्यक्षिके दिले.
याप्रसंगी सकाळी ललित कला केंद्र चोपडा या फलकाचे हार अर्पण करून पूजन करण्यात आले.तर स्वर्गीय डॉ मातृतुल्य सुशीलाबेन शहा यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून प्राचार्य सुनील बारी यांनी नवीन विद्यार्थ्यांना ललित कला केंद्र स्थापनेचा उद्देश व हेतू स्पष्ट करून सांगितला व संस्थाचालकांना धन्यवाद दिले.संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूनमबेन गुजराथी,सचिव सौ. उर्मिलाबेन गुजराथी ,सहसचिव अश्विनीबेन गुजराथी, उपप्राचार्य प्रा.आशिषभाई गुजराथी,चोपडा यांनी उपस्थिती देऊन ललित कला केंद्रावर अनेक शुभेच्छांचा वर्षाव करत सगळ्यांचे अभिनंदनही केले.

