कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव

 कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  आमदार रमेशदादा पाटील यांचा समाज भूषण पुरस्काराने गौरव

     

नाशिक  दि.१७(प्रतिनिधी)येथील सामाजिक संस्था "आदिवासी कोळी जमात बहुउद्देशीय डेव्हलपमेंट फाऊंडेशन नाशिक" यांच्या वतीने  कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार श्री. रमेशदादा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक श्री युवराज सैंदाणे आणि अध्यक्ष श्री नितीन शेवरे यांच्या हस्ते तसेच कोळी महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री गुलाबराव गांगोडे व उपाध्यक्ष श्री गणेश राजकोर यांच्या प्रमुख उपस्थितीत   समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला! 

      माणूस कोठे पोहोचला, यापेक्षा कुठून कुठे पोहोचला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमदार रमेशदादा पाटील.अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला, खेडेगावात शिक्षण घेऊन आज ते उद्योगपती म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून घेतली.  समाज कार्यासाठी, सुलभभावनेचा त्याग करून समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार दादांनी केला समाजासमोर त्यांनी  शपथ घेत  समाजाचा विकास करण्यासाठी विडा उचलला!    त्यांची समाजसेवा   प्रेरणादायी  असल्याने समाजभूषण पुरस्कार 2023)  गौरविण्यात आले आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने