लासुरचे माजी सरपंच देवीलाल बाविस्कर यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश शिवसेनेत

 लासुरचे माजी सरपंच देवीलाल बाविस्कर यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश शिवसेनेत प्रवेश

लासूर ता.चोपडा(प्रतिनिधी)- येथील माजी सरपंच देविलाल बाविस्कर यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.तालुक्याचे आ.लताताई सोनवणे तसेच माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.लासूर गावात शिवसेनेच्या प्रसाराकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी सरपंच देविलाल बाविस्कर यांनी व्यक्त केले.याप्रसंगी संजय गांधी निराधार समिती सदस्य ए.के.गंभीर,राजेंद्र पाटील,किरण देवराज, मंगला पाटील,किरण करंदीकर,गणेश पाटील,कैलास बाविस्कर यांच्यासह लासूर गावातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने