उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल चा संघ विजेता

 उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत यशवंत पब्लिक स्कूल चा संघ विजेता

जळगाव....विजेत्या संघासाह पदाधिकारी व प्रशिक्षक
चाळीसगाव  दि.16 (प्रतिनिधी): जळगाव येथील शेठ ला ना विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या उर्वरित जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी(ता 40 गाव) येथील यशवंत पब्लिक स्कूल चा 14 वर्षाखालील मुलींचा संघ विजेता ठरला.याच शाळेचे तीन संघ विविध वयोगटात उपविजेते ठरले.विजेत्या संघाची विभागस्तरीय निवड करण्यात आली आहे.   

यशवंत पब्लिक स्कूल वाघळी च्या मुख्याध्यापिका जयश्री परमानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रीडा अधिकारी मीनल थोरात, जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशन चे सचिव प्रमोद पाटील,यशवंत पब्लिक स्कूल चे नेटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे ,ला.ना हायस्कूलचे क्रीडाशिक्षक उल्हास ठाकरे , श्री जगताप, खुशाल देशमुख, जे.पी.वाघ ,विनय काळे ,प्रकाश महाजन, ,धना भोळे उपस्थित होते........



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने