हिंदू -मुस्लीम बंधू भाव जोपासावा हीच खरी ईद ए मिलाद : हाजी उस्मान शेख यांचे प्रतिपादन..
♦️सूरमाज़ फाऊंडेशन तर्फे कमला नेहरू मुलींचे वसतीगृहात फळं वाटप करून ईद-ए-मिलाद साजरी
चोपडा दि.२८(प्रतिनिधी) हिंदू -मुस्लीम, सिख्ख- ईसाई असा कोणताही भेद न करता मानवता हा एकच धर्म असल्याची शिकवण आपल्यात रुजली पाहिजे. मोठ्यांचा आदर, एकमेकांविषयी जिव्हाळा, बालकांवरील प्रेम हे दिवसेंदिवस कमी होत चालले असून हे थांबवून जाती पातीच्य खोल खड्ड्यात न पडता बंधू भाव जोपासावा असा मोलाचा सल्ला सूरमाज़ फाऊंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी येथे दिला.
ते कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चोपडा येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक नव्हते, ते अल्लाहचे दूत म्हणून काम करत होते आणि त्यांनी केलेले काम प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने केले पाहिजे आणि ज्या कामाला त्यांनी मनाई केली आहे, त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण आत्मसात केल्या आहेत असेही स्पष्ट केले.
प्रारंभी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुरमाज फाऊंडेशन वतीने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीचेऔचित्य साधत ईद ए मिलाद निमित्त५० आदिवासी विद्यार्थींनींना सफरचंद,संत्रा,केळी आदि फळ वाटप करण्यात आले.
यावेळी अबुल्लैस शेख, मुराद भाई, झियाउद्दीन काझी साहब, डॉ एमडी रागीब, शोएब शेख, जुबेर बेग, शुभम भाई, इम्रान भाई पलंबर, अब्दुल कादिर, डॉ मोहम्मद ज़ुबेर शेख , समाधान सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शुभम सोनवणे, पत्रकार महेश शिरसाठ,वसतीगृह अधिक्षिका कावेरी कोळी व कर्मचारी उपस्थित होते.