गणपूरला गोविंद प्रभू जयंतीला लोटला भक्तांचा जनसागर
गणपूर(ता चोपडा)ता 28: येथे श्याम उपदेशी महानुभाव पंथीय बांधवांनी आयोजित केलेल्या गोविंद प्रभू जयंतीच्या कार्यक्रमांना भक्तांनी गर्दी करत मोठ्या हर्षोल्हासात पालखी मिरवणूक काढली.
पंचावतारातील गुरू गोविंद प्रभू यांच्या जयंती निमित्त दुपारी दत्त मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी गावभर रांगोळी काढून गोविंदप्रभु प्रतिमा व विशेष ची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी बँड च्या तालात श्याम उपदेशी भजनी मंडळाने भजने गायिली.गरभा नृत्ये सादर करण्यात आली.दिवसभर झालेल्या कार्यक्रमांसाठी उपदेशी बांधवांनी परिश्रम घेतले.