सर्व पवित्र धर्म ग्रंथ मानवतावादी विचारांनी प्रेरित - शुभम सोनवणे

 सर्व पवित्र धर्म ग्रंथ मानवतावादी विचारांनी प्रेरित - शुभम सोनवणे

चोपडा दि.२९(प्रतिनिधी)- काल इस्लाम धर्माचा पवित्र सण ईद ए मिलाद च्या निमित्ताने शहरातील कमला नेहरू वसतीगृह या ठिकाणी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी, विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनपर कार्याची ओळख करून देण्यात आली. सामाजिक सलोखा, बांधिलकी व मानवतावादी दृष्टिकोनातून प्रगत देश स्थापन करण्याचे विचार रोवण्यात आले. त्याच प्रमाणे, सर्व धर्मांच्या पवित्र ग्रंथात मानवता, एकता, सलोखा, बंधुता याच विचारांना केंद्रबिंदू मानण्यात आले असल्याचे विचार सामाजिक कार्यकर्ते श्री. शुभम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिले

त्या, प्रसंगी बोलत असताना, सुरमाज फाउंडेशन चे अध्यक्ष हाजी उस्मान शेख  यांनी, मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून प्रेरणा दिली. समवेत, वसतिगृहाचे संचालक श्री.महेश शिरसाठ, श्री. समाधान सोनवणे , श्री. अबुलाईस शेख, डॉ. रगिफ शेख,मो. अब्दुल कादीर व सुरमाज फाउंडेशन चे सदस्य उपस्थित होते. श्री. अबुलाईस शेख यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने