आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते गुळ प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून सोडले पाणी..लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी होणार लाभ
चोपडा दि.२९(प्रतिनिधी)गुळ मध्यम प्रकल्पातून आज दि. २९/९/२०२३ रोजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे याच्या प्रमुख उपस्थितीत गुळ नदी परिसरातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी फायदा व्हावा म्हणून डाव्या कालव्यातून आज पाणी सोडण्यात आले यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उजव्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करुन त्यातही लवकरात लवकर पाणी सोडणेबाबत सुचना केली तसेच सुनील अमृतकर उपअभियंता यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, सौ.मंगलाताई पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे ,मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील,उपअभियंता सुनील अमृतकर, बांधकाम विभागाचे विरेंद्र राजपूत,शाखा अभियंता राहुल भालकर,बाजार समिती संचालक गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील,किरण देवराज, राजेंद्र पाटील, प्रताप अण्णा पाटील,ए. के. गंभीर सर,गोपाल चौधरी, कुणाल पाटील,गुलाब ठाकरे वसंत पाटील,भागवत कोळी, नंदु पाटील,उदयभान इंगळे, संजय सोनवणे,गजेंद्र पाटील, सतीलाल धनगर,अमोल शेटे, उमाकांत कोळी,मंगल इंगळे , श्री.शिवाजी लक्ष्मण पाटील, पद्माकर पाटील ,विकास माळी, श्रीकांत पाटील विद्याधर पाटील, बबलू पाटील , सोमनाथ पाटील गजानन बाविस्कर शुभम कोली. रामलाल बारेला,विलास बेलदार, ईश्वर कोळी,गुलाब पावरा हे उपस्थित होते