गरोदर व स्तनदा मातांना योग्य आहार देऊन कुपोषण होणारच नाही याची काळजी घ्या : आमदार सौ.लताताई सोनवणे

 गरोदर  व स्तनदा मातांना  योग्य आहार देऊन कुपोषण होणारच नाही याची काळजी घ्या : आमदार सौ.लताताई सोनवणे



चोपडा दि.३०(प्रतिनिधी)गरोदर    माता, स्तनदा मातां व किशोर वयीन मुली यांना योग्य आहार देऊन कुपोषण होणारच नाही  यासाठी  सर्व अंगणवाडी सेविकांनी मनापासून काम करावे असा मोलाचा सल्ला आमदार सौ लताताई सोनवणे यांनी  दिला.त्या धानोरा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना  अंतर्गत   पोषण माह अभियान कार्यक्रमात  बोलत होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे  म्हणून उपस्थित माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे  यांनीही बालक व मातांची खुप मोठी सेवा करण्याचे कार्य तुमच्या हातात आहे.ते प्रामाणिकपणे करुन चांगला आशिर्वाद  पदरी पाडण्याचे भाग्य आपल्या नशिबी आले आहे. बालकांची सेवा ही उत्तम सेवा आहे त्यासोबत सर्व सेविकांनी आपापल्या घरातील वृद्धांची काळजी घेऊन वृध्दाश्रमात पाठवण्याची वेळ येवू देवू नका असे सांगून  अंगणवाडी सेविकांच्या कामाची प्रशंसा केली.
यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी  संजय धनगर , माजी सभापती माणिकचंद महाजन तसेच गावातील सरपंच मान रज्जाक तडवी,उपसरपंच मान विजय चौधरी ,ग्रामविकास अधिकारी विकास इंधे, शिक्षक सेना अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे,पर्यवेक्षिका मंजुळा वसावे हे उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन पर्यवेक्षिका जयमाला दशरथ शिरसाठ यांनी केले.  प्रसंगी आरोग्य सेवक,आशावर्कर व, सेविका, मदतनीस व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने