चोपडा येथे गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणास .. आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते प्रारंभ
चोपडा, दि.१३(प्रतिनिधी)आज दिनांक १३/९/२३ रोजी शासकीय विश्राम गृह चोपडा येथे आदरणीय लताताई सोनवणे, आमदार चोपडा तसेच मा. आदरणीय चंद्रकांत सोनवणे, बंगाळे उपविभागीय अधिकारी चोपडा भाग , श्री. देवेंद्र नेतकर, पुरवठा तपासणी अधिकारी, योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक, सुदर्शन दुर्योधन, पुरवठा निरीक्षक तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचे सह चोपडा तालुक्यातील समस्त नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वितरण ची सुरुवात करण्यात आली आहे.
चोपडा तालुका मध्ये एकूण ४६८०८ लाभार्थी यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात येणार असून त्यामध्ये चणाडाळ,रवा,साखर,खाद्यतेल समाविष्ट असून पात्र लाभार्थी यांना तातडीने वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे..
कार्यक्रमस्थळी चोपडा तालुक्यातील समस्त, सभापती नरेश पाटील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती ,संचालक रावसाहेब पाटील शिवराज पाटील ,किरण देवराज,सौ. मंगलाताई पाटील,सौ.शितल देवराज,कैलास बाविस्कर,राजेंद्र पाटील,रमेश बापु ठाकुर, प्रकाश दादा राजपूत,अशोक पाटील,दशरथ बाविस्कर,गणेश पाटील,प्रताप पावरा, किरण करंदीकर, भास्कर पाटील,दिपक कोळी,प्रविण देशमुख,दिव्यांक सावंत नंदु गवळी,संदीप कोळी,मुकेश कोळी, व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने पात्र लाभार्थी उपस्थित होते.
