क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात वटार-रुखनखेडा गावांतप्रभात फेरीद्वारा जनजागृती

 




क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रमात वटार-रुखनखेडा गावांतप्रभात फेरीद्वारा जनजागृती


चोपडा दि.१४(प्रतिनिधी)जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये   यांच्या आदेशानुसार, तथा चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर यांच्या मार्गदर्शनानुसार,"क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत" या उपक्रमांतर्गत चोपडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद अंतर्गत  ग्रामपंचायतीसाठी निवड झालेल्या, अडावद, वटार, रुखनखेडा या सर्व गावामध्ये क्षयरोग आजाराबाबत, गावातील लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने.. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत, निबंध, विविध स्पर्धा आयोजित करून,तसेच विविध उपक्रमां मार्फत,ग्रामपंचायत स्तरांवरील ग्रामसभा, चावढि बैठका घेवून त्यात क्षयरोग आजारा विषयी सखोल माहिती दिली जात असुन,या उपक्रमात निवड ग्रामपंचायतींना भेट देऊन "टीबी सपोर्ट ग्रुप" ची स्थापना करण्यात आली.

वटार येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावांत प्रभातफेरी काढून त्यामध्ये, 

"टी बी हारेगा, देश जितेगा",  

"डॉट्सची गोळी, करी क्षयरोगाची होळी", 

"क्षयरोगी कळवा, पाचशे रुपये मिळवा" अशा घोषणा प्रभातफेरी द्वारा म्हणुन, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.बैठकीत ग्राप.सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राप.सदस्य, शिक्षक,  अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांना,STLS- किशोर सैदाणे व आरोग्य सेवक- विजय देशमुख यांनी या अभियानाबाबत,ग्रामस्थांना सखोलपणे माहिती देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी वटार व रुखनखेडा या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक-जयंत पाटील, वरिष्ठ क्षयरोग तपासणी पर्येंवेक्षक-प्रमोद पाटील, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक-किशोर सैदाणे, आरोग्य सेवक-विजय देशमुख, शिक्षक-महाजन सर, श्रीम.सुलताने मॅडम, आशा सेविका-ज्योती कोळी, रेखा सोनवणे, गुलाब ठाकरे, नानाभाऊ सोनवणे आदींनी कर्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने