दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी”भव्य कार्यक्रम १७ सप्टेंबरला जळगावी..४ मंत्र्यासह १३ आमदार ,२ खासदारांची खास उपस्थिती
जळगाव दि.१३(प्रतिनिधी)दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासनातर्फे दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी” हा कार्यक्रम दि. १७ सप्टेंबर २०१३, रविवार रोजी सकाळी १०:०० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर, महाबळ रोड, जळगांव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील हे भूषविणार असून दिव्यांग कल्याण विभागाचेअध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ना. श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा)  यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे .
यावेळी मुख्य अतिथी म्हणून ग्राम विकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. श्री. गिरीष महाजन,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. अनिल भाईदास पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.तसेच खासदार श्रीमती रक्षा खडसे, आ. किशोर दराडे ,आ. संजय सावकारे ,आ. श्री. किशोर पाटील आ.  मंगेश चव्हाण ,खा.  उन्मेष पाटील ,आ.किशोर पाटील ,आ.सत्यजित तांबे,आ. सौ. लताताई सोनवणे ,आ. शिरीष चौधरी आ.चंद्रकांत पाटील ,आ. सुरेश भोळे ,आ. एकनाथ खडसे,आ.चिमणराव पाटील हे  मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय सचिव अभय महाजन , दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके  ,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे  ,  प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ हेही आवर्जून उपस्थिती देणार आहेत. 
तरी दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित  राहावे असे आवाहन जिल्हाधिकारीआयुष प्रसाद , मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड , जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित ,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील,जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे 
