चोपडा येथे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटिल यांचा सत्कार

 

*चोपडा येथे बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटिल यांचा सत्कार..

*चोपडा दि.१२(प्रतिनिधी):-* तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्राचे विभाग समन्वयक नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव मार्केट कमेटीचे माजी सभापती व विद्यमान संचालक लक्ष्मणराव पाटील उर्फ लकीअण्णा टेलर यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात नुकताच आपल्या शेकडों समर्थकांसह प्रवेश केला असुन त्यांचेवर जळगाव जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी चोपडा येथील बापुजी काम्प्लेक्स मधील श्री एकविरा क्रुषि सेवा केंद्रा शेजारील बीआरएस पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर, जिल्हा महिला समन्वयक सौ. कोमल पाटिल, विधानसभा समन्वयक समाधान बाविस्कर, युवासमन्वयक अनिल कोळी, तालुकाप्रमुख दिपकराव पाटिल, सामा.कार्यकर्ते दिनकरराव सपकाळे, पमाताई पानपाटिल, वर्षा चौधरी, वैभवराज बाविस्कर यांचेसह असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.

            याप्रसंगी बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील म्हणाले की, लवकरच जिल्हाभरात बीआरएसच्या शाखा स्थापन करणार असुन जास्तीतजास्त लोकांना आपल्या पक्षात सभासद करून पक्षप्रवेशाचे काम जोरावर सुरू आहे. मागील एक महिन्याभरापासून जिल्ह्यातील जवळपास निम्मे तालुक्यांचा दौरा झाला असून रोजच शेकडों कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश घेत आहेत. येणाऱ्या ग्रा.पं., न.प., पं.स., जि.प., विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण ताकदीने लढणार आहोत. ह्या सर्व निवडणुकांत संभाव्य व इच्छुंक उमेदवारांची चाचपणी सुरू असुन बीआरएस पक्षात प्रवेश घेऊ इच्छिणारे कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुका व जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून सभासद नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने