सावली संस्थेमार्फत दिव्यांगाचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

सावली संस्थेमार्फत दिव्यांगाचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

जळगाव,दि. १२(प्रतिनिधी) मुंबईयेथील सावली सहयोग संस्थेमार्फत दिव्यांगाच्या  विविध सरकारी  योजना , नोकरी, शिक्षण, रोजगार याविषयी मार्गदर्शन शिबीर  गीता विकास हाँल बाजीप्रभू देशपांडे मार्ग शिवाजी नगर गोवंडी येथे घेण्यात आले यावेळी दोनशेहून अधिक दिव्यांग बाधवांनी शिबीराचा लाभ घेतला तसेच संस्थेतर्फे ई.रिक्षा उद्योगासाठी  देण्यात येणार आहे .
संस्थेचे अध्यक्ष राजेश घोलप यांनी सावली सहयोग संस्था विविध प्रकारच्या सहकार्य दिव्यांग बाधवांना करते  असे सांगून  मार्गदर्शन  केले.   संस्थेला   हाँल व जेवण उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अबु आझमी  यांचे  व त्यांच्या सर्व नगरसेवक  टिमचे  आभार श्री.विशाल ताम्हणकर  ( सचिव ) यांनी मानले.कार्यक्रमास  स्थानिक नगरसेवक इरफान खान , तसेच श्रीमती ग्लोरीया मोरीस (समाजसेविका),केतन कदम (मुंबई अध्यक्ष युवा जनता दल), अनंत सावंत  ( द.म.जि.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ) , श्रीम.अँड.रिया करंदीकर मँडम ( उच्च न्यायालय वकील )तसेच सर्व सावली सहयोग संस्थेचे मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने