'शिक्षक दिनानिमित्त शिक्षक,शिक्षीका व अंगणवाडी सेविकांचा सत्कार
चोपडा,दि.८ (प्रतिनीधी) -तालूक्यातील चौगाव येथील रहीवासी सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.संदीप कोळी यांनी शिक्षक दिनानिमित्त चौगाव येथील जि.प.केंद्र शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व अंगणवाडी सेविका यांचा आज रोजी शाल,गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
शिक्षकांचे आपल्या मुलांना घडविण्यात मोलाचे कार्य असते.हा विचार मनात बाळगून सामाजिक दायित्वातून आगळ्या वेगळ्या पध्दतीने संदीप कोळी यांनी शिक्षक दिवस साजरा केला आहे.या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते श्री.केैलास बाविस्कर (लासुर)हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेला नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन संदीप कोळी व शिक्षकवृंद,अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले.
यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून गावातील पोलीस पाटील श्री.गोरख पाटील,व श्री.विजय ढिवरे आदी मान्यवर उपस्थित होते.रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल बाविस्कर यांनी शिक्षकवृंदांचे व अंगणवाडी सेविकांचे कामाची दखल घेऊन रोटरॅक्ट क्लब च्या वतीने यावेळी शुभेच्छा पत्र आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दिले.शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षीका व अंगणवाडी सेविका यांचा यावेळी सत्कार केल्याने त्यांना मनस्वी आनंद झाला.व या उपक्रमाबद्दल शाळेतील मुख्याध्यापक श्री. संतोष सोनवणे यांनी संदीप कोळी व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक विलास पाटील,प्रदीप बोरस,विद्यानंद साठे,रूषिकेष पाटील व शिक्षिका कपीला पाटील,राजश्री बाविस्कर,प्रितम सोनवणे आदी शिक्षकवृंदा सह गावातील युवक रामकृष्ण देवरे,रूषिकेश कोळी, प्रफुल्ल पारधी,पवन कोळी,गजानन कोळी यांनी परिश्रम घेतले.व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक विलास पाटील यांनी केले.
