सुटकारला लिक लाईने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.. गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात.. अहो प्रशासक साहेब लक्ष घालणार की नाही? संतप्त नागरिकांचा सवाल
चोपडा दि.८(प्रतिनिधी) तालुक्यातील
सुटकार गावात दोन तीन ठिकाणी पाईप लाईन लिक झाल्याने दुषित पिण्याचे पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीचे आजाराची लागण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासकांकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही पाठ फिरवल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घसा दुखीसह थंडी ताप आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतीवर असून वेळीच उपाययोजना न झाल्यास प्रशासनकर्त्यांना जबाबदार धरण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन छेडले जाईल अशी माहिती गावकऱ्यांनी झटपट पोलखोल न्यूजशी बोलतांना दिली आहे.
यासंदर्भात
आरोग्य अधिकारी अडावद यांच्याकडे सुटकार गावातल्या लोकांकडून निवेदन दिले असून त्यात त्यांनी नमूद केले आहे की, सुटकार गावात सध्या परिस्थितीत प्रशासक लागले आहे. गावात रोज दुषित पिण्याचे पाणी येत आहे. गावकऱ्यांनी शिपाई व आशावर्कर व ग्रामसेवक भाऊसाहेबांकडे
पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तीन ठिकाणी फुटली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तरीही या गंभीर प्रकारांकडे कोणीही लक्ष घालीत नसल्याने
रोजच दुषित पिण्याचे पाण्याचा पुरवठा गावात होत आहे त्यामुळे गावात थंडी, ताप व घशाचे आजाराची लागण बऱ्याच जणांना होत आहे . तसेच संपूर्ण पावसाळा संपत आला तरी पिण्याच्या पाणीच्या टाकीत TCL टाकले गेले नाही हे ग्रा.पं.शिपायाने सांगितल्यावर
ग्रामसेवकाने TCL आणले मात्र ते फक्त प्लॉट भागाकडील शिपायाकडे दिले व इतर भागाकडील शिपायाला TCL दिले नाही परिणामी ईतर भागातील पिण्याच्या पाणीच्या टाकीचा खोटा रीपोट बनवला गेला अशी दुजाभावाची भावना ठेवणाऱ्या ग्रामसेवकावर योग्य ती कारवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे .
या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत ठाकरे, प्रमिलाबाई पंढरीनाथ"" चंदूभास्कर सोनवणे,दीपाली सुर्यकांत ठाकरे,आकाश अरुण ठाकरे,नागेश संजय सपकाळे,प्रविण मच्छिंद्र ठाकरे ,संजय हिंमत कोळी ,जगदीश हिलाल ठाकरे,संजय पंडीत कोळी ,नलूबाई देवराम कोळी ,समाधान जनार्दन कोळी रवींद्र ज्ञानेश्वर ठाकरे,रोहिदास जनार्दन ठाकरे,शांताराम नामदेव सपकाळे, प्रकाश सुपडू कोळी आदींच्या सह्या आहेत.
