चोपडा मतदार संघात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान.. तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे आ.लताताई सोनवणे यांची मागणी
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चोपडा मतदार संघातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला आहे.त्यांना ताबडतोब नुकसानभरपाई मिळावी याकरिता नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ताबडतोब कामाला लावा अशी जोरदार मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
चोपडा मतदार संघात चोपडा व यावल तालुक्यात दि.१५/०९/२०२३ व १६/०९/२०२३ रोजी झालेल्या सतत पावसामुळे तसेच व हतनुर अनेर व गुळ धरणाचे पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे आलेल्या पुरात दोन्ही तालुक्यात शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून त्याला ताबडतोब मदतीची गरज आहे त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे तात्काळ
करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना फर्मावेत असेही त्यांनी सुचित केले आहे.
