चोपड्यात श्री स्थापनेच्या पावनमुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी यांच्या हस्ते श्री विघ्नहर्ता गणपती मंदिर बांधकामाचा "श्रीगणेशा"
चोपडा दि.२०(प्रतिनिधी ) :शहरातील हुडको कॉलनी परिसरात दिनांक 19/09/2023 रोजी सकाळी 10.40 वाजता गणपती स्थापनेच्या शुभपर्वावर सामाजिक कार्यकर्ते तथा युवा शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर ओतारी यांच्या शुभहस्ते श्री विघ्नहर्ता गणपती मंदिराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.येत्या सहा महिन्यात मंदिर बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास मंदिर निर्माण समिती कार्यकर्त्यांनी व्यक्त करत दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विधीवत पूजा सागर ओतारी यांच्या हस्ते होऊन कुदळ मारुन गणपती बाप्पा मोरयाचा जयकारा करत कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, ,पत्रकार महेश शिरसाठ,मंगलबा पाटील,हेमकांत गायकवाड,विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुकेश अहिरे,दिनेश पवार, सुधाकर भोले, विजय भावसार,मंगल जाधव , सदिप सोनार,दिनेश जाधव -देविदास अहिरे,ईश्वर बोरसे, इंजिनियर विशाल भावसार,राजु पाटील,विकास सोनार,चंद्रकांत सोनार,प्रथमेश भावसार,राहुल भावसार,विजय कोळी,किला कोळी,सोमेश अहिरे,भावलाल महाजन,प्रमोद भावसार,सुरेश परमार,कृष्णा पाटील,सागर अहिरे,विजय धनगर,दिपक महाजन,कृष्णा भावसार,उत्तम,सचिन अहिरे,श्याम मराठे,दिपक महाजन,जयेश सोनार,रुपेश महाजन,सुशिलाबाई आहिरे,तमना भावासार,मिराबाई सोनार,ज्याती पाटील,चित्रबाई कोळी,हिराबाई कोळी,निर्मलाबाई महाजन,रेखा अहिरे,आशाबाई अहिरे,निर्मलाबाई भावसार,आशाबाई भावसार सविताबाई सोनार,कोशल्याबाई मोळे,ललिताबाई भावसार कल्पनाबाई अहिरे व परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
