कोचिंग क्लासेस संघटनेचे शिक्षकदिन पुरस्कार जाहीर!


कोचिंग क्लासेस संघटनेचे शिक्षकदिन पुरस्कार जाहीर!


नाशिक दि.२६(प्रतिनिधी): येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात पीसीसीडीए या संस्थेचे वार्षिक जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक ( एक्सलन्स इन कोचिंग अवॉर्ड २०२३) ची घोषणा करण्यात आली असून यात शहर व जिल्ह्यातील १७ शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. सोमवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, रोटरी हॉल, गंजमाळ येथे  होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पदवीधर मतदार संघाच्या नाशिक विभागाचे आमदार डॉ सत्यजित तांबे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके आणि सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन डॉ रविंद्र सपकाळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.*

     *यंदाच्या पुरस्कार्थींमध्ये हेनरी सर इंग्लिश स्पीकिंग अकॅडमीचे सरदार हेनरी, सावतानगर येथील जाधव क्लासेसच्या सीमा जयवंत जाधव, शिवाजीनगरच्या दीप कॉमर्स क्लासेसचे इम्रान पटेल, मनमाडच्या सिद्धी क्लासेसच्या भाग्यश्री दराडे, इंदिरानगरच्या सुगम संस्कृतच्या गौरी जोशी, इंदिरानगरच्या चिंतामणी कॉमर्स अकॅडमीचे सहशिक्षक प्रणव कुलकर्णी, रविवार कारंजावरील परांजपे प्रोफेशनल अकॅडमीचे सहशिक्षक कृष्णकुमार वाघ, यश क्लासेस पचवटीचे सहशिक्षक मनीष जोशी, सातपुरच्या तिडकेज् अकौन्टन्सी क्लासेसचे शशिकांत तिडके, मनमाड येथील सय्यद कोचिंग क्लासेसचे इम्रानअली सय्यद, गंगापुररोडच्या जिनियस प्लस एज्युकेअर प्रा लि चे तन्मय जगताप, मनमाडच्या सय्यद कोचिंग क्लासेसचे सहशिक्षक मुब्बशिर रझा खुर्शिद,  गंगापुर गांवातील निरंकारी क्लासेसच्या त्रिकुला महेश थोरात, लक्ष्मीनगरच्या कांकरीया अकॅडमीच्या वैशाली रविंद्र कांकरीया, व्दारका येथील स्कॉलर्स हब क्लासेसचे सहशिक्षक राजेश आहेर, डीजीपीनगरच्या कन्सेप्ट लर्निग हबचे किरण पवार, सचिन मोरे आदी शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, अशोक देशपांडे, राज्यप्रतिनिधी रविंद्र पाटील, सांस्कृतिक प्रमुख पवन जोशी, कैलास खताळे, प्रतिभा देवरे, लोकेश पारख, गणेश कोतकर, माधवी चिंतामणी, विद्या राकडे, सुनील सोळंकी, पराग घारपुरे, प्रमोद गुप्ता, शिवप्रेमी अर्जुन शिंदे, जयवंत जाधव, किशोर सपकाळे, सुनील आहेर, संतोष पवार, निंबाजी राकडे, भालचंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.*



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने