पं.वि.दि.पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्काराने चोपड्याचे वसंत मयूर सन्मानित

 पं.वि.दि.पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्काराने चोपड्याचे वसंत मयूर सन्मानित

चोपडा,दि.२७(प्रतिनिधी) ,- नवी मुंबई येथील अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे तबला/गायन श्रेत्रात अतुलनीय योगदानाबद्दल चोपडा येथील सेवानिवृत्त संगीत शिक्षक वसंत मयुर यांना कै.पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर राष्ट्रीय संगीत रव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     एका कार्यक्रमात  नवी मुंबई वाशी येथे पं.पलुस्कर यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात कथ्थक नृत्य संगीताचार्य पद्मश्री पुरू दाधीच, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, गां.म.वि मंडळाचे अध्यक्ष~ बाळासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष~ डाॅ. देवेंद्र कुळकर्णी,कोषाध्यक्ष~ डाॅ. किशोर देशमुख या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

        वसंत मयूर हे चोपडे शिक्षण मंडळ संचलित प्रताप विद्या मंदिरातून संगीत शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.ते सातत्याने गेली ५५ वर्षे तबला वादनाचा प्रचार, प्रसाराचे कार्य करीत आहेत. ते गायन व तबल्यात विशारद असून विविध पुरस्कारांनी सन्मानित आहे.जळगाव जिल्ह्यातील संगीत प्रेमी मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने