राष्ट्रवादी शिक्षक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध समस्यांचे निवेदन

  

राष्ट्रवादी शिक्षक  व प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने गट विकास अधिकाऱ्यांना विविध समस्यांचे निवेदन


 चोपडा दि.१(प्रतिनिधी ): तालुक्यातील नवनिर्वाचित गट विकास अधिकारी आर. ओ.वाघ  यांना नुकताच राष्ट्रवादी शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्तपणे निवेदन देऊन  संघटनेच्या वतीने  त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी समस्या सोडवण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. 

या निवेदनात ,चोपडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे मराठी हिंदी सुट बाबत राहिलेल्या उर्वरित लोकांचे व त्यासोबत जुन्या २१३ लोकांचे आदेश लवकर मंजूर करण्यात यावे.,शिक्षण विभागात एक वरिष्ठ लिपिक व एक कनिष्ठ लिपिक यांना त्वरित आदेश द्यावे,बारा वर्षे पूर्ण केलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदला त्वरित पाठवण्यात यावे,चार महिन्यापासून एलआयसी कार्यालयात अद्याप न पोहचलेले हप्ते शिक्षण विभागाकडून थकित असलेले हप्ते कसे पोहोचतील याची त्वरित व्यवस्था करावी,आतापर्यंत मंजूर झालेले मेडिकल  बिलांची मागणी त्वरित जिल्हास्तरावर करण्यात यावी. व इतर लोकांची थकीत फरक यांची मागणी करण्यात यावी. व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. सगळे प्रश्न लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन आर.ओ.वाघ  यांनी दिले.

 यावेळी ग.स.सोसायटीचे माजी संचालक राजेंद्र साळुंखे, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे जिल्हा उपाध्यक्ष व पारोळा सोसायटीचे संचालक पंकज बडगुजर,जुनेद जनाब, असलम खान तालुकाध्यक्ष प्रदीप बोरसे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संभाजी पाटील एकनाथ पाटील पारोळा सोसायटीचे संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने