संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध ताबडतोब अटक करा आंबेडकर समाजाचे तहसीलदारांना निवेदन
चोपडा,दि.१ (प्रतिनिधी) : महात्मा ज्योतीबा फुले व महापुरूषांच्या विरोधात नेहमी घाणेरडे वक्तव्य करून महापुरूषांची बदनामी करत असलेल्या मनोहर कुळकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्यावर त्वरीत कार्यवाही करून तात्काळ अटक करावी अशी जोरदार मागणी चोपडा तालुक्यातील सर्व आंबेडकर समाजाने तहसीलदारांकडे कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी नमूद केले की , संभाजी भिडे नावाचे व्यक्तीने महात्मा ज्योतीबा फुले व महापुरूषांच्या विरोधात नेहमी घाणेरडे वक्तव्य करून महापुरूषांची बदनामी करून बहुजन लोकांना भडकाविण्याचे काम करून देशात दंगली कशा घडतील हे काम ते करीत असतात म्हणून भिडेला व त्याच्या सहकाऱ्यांना त्वरीत अटक करून जेलमध्ये टाकावे. कारण त्यांच्या वर भिमा कोरेगाव येथील दंगलीचा आरोप आहे. परंतु सरकार व शासन त्यांना नेहमी पाठीशी घालत असते, याला कोण जबाबदार आहे हे जनतेसमोर उघड झाले पाहीजे आणि त्याच्या अशा वागण्याने जाती-जातीमध्ये, समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते व बहुजन तरूणांचे माथे भडकावून दंगलीला प्रवृत्त करीत असतो. कधीही हिंदू तर कधी मुसलमान तर कधी दलीत यांना टारगेट करून आपली पोळी भाजण्याचे काम ते करीत असतात असा आरोप करीत त्यांच्यावर द्वेष द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, नाहीतर आंबेडकर समाज त्याला रस्त्याला फिरू देणार नाही परिणामी त्यास शासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे तसे निवेदन दि.१/८/२०२३ रोजी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिले आहे.निवेदनप्रसंगी गोपाल राव सोनवणे, बंटी भाई वाघ, शिंदे देवानंद धनसिंग, दीपक दौलत वानखेडे, विवेक सोनवणे यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.