.. आता शेतकऱ्यांना वजनाची माहिती मिळणार मोबाईलवर खान्देशात चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती अव्वल

.. आता शेतकऱ्यांना वजनाची माहिती मिळणार मोबाईलवर  खान्देशात  चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती अव्वल 

चोपड़ा,दि..२९( प्रतिनिधी)चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीचे चोपडा, अडावद व  गलंगी भुईकाट्यावर शेतकरी बांधवांसाठी आपल्या शेतमालाचे वजन एस.एम.एस. द्वारे तात्काळ माहीती व्हावी म्हणून  एस.एम.एस. मॉडर्न सिस्टमचा आज रोजी दिनांक 29/8/2023 पासुन प्रारंभ करण्यांत आलेला आहे. अशी सुविधा देणारी खान्देशातील पहिली बाजार समिती  ठरली असून  शेतकरी बांधवानी आपले वाहन मोजतांना आपला मोबाईल नंबर द्यावा  अशी माहिती सभापती नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली. 

याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती                  विनायकराव रामदास चव्हाण ,घन:श्याम निंबाजी पाटील  संचालक, नंदकिशोर भानुदास पाटील संचालक,विजय शालीकराव पाटील ,अनिल रामदास पाटील ,मिलींद गणपतराव पाटील ,  सौ.सोनाली नारायण पाटील ,सौ. कल्पना भरत पाटील ,  मनोज अशोकराव सनेर  ,नंदकिशोर चिंधु धनगर ,      गोपाल श्रीराम पाटील ,वसंत पिरन पाटील , किरण रामलाल देवराज ,शिवराज संभाजी पाटील ,  सुनिल मगनलाल अग्रवाल ,सुनिल तिलोकचंद जैन ,  नितीन शालीग्राम पाटील , या संचालकांसह आर.बी.सोनवणे सचिव,  जे.एस. देशमुख उप सचिव, आदी उपस्थित होते.



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने