कोळंबा-जळगाव बस पूर्ववत सुरू करा अन्यथा बीआएस तर्फे आंदोलन :सौ.कोमलताई पाटील
*जळगाव दि.२७(प्रतिनिधी महेश शिरसाठ)* भारत राष्ट्र समिती महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक सौ. कोमलताई बापुराव पाटील यांनी जळगाव ते कोळंबा मुक्कामी बस सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की कि जळगाव - कोळंबा ही मुक्कामी बस पुर्ववत सुरू केल्यास विद्यार्थी व तसेच जेष्ठ नागरीकांचे गैरसोय दूर होईल ही बस नियमीत चालु होती परंतु काही कारणास्तव जळगाव धरणगाव मार्गे जाणारी ही बस बंद करण्यात आली आहे त्यामुळे विदयार्थी व जेष्ठ नागरीकांचे व महिलांचे अतोनात हाल होत आहे. तरी व्यवस्थापकांनी आपल्या अधिकारात ही बस सेवा पुन्हा सुरू करावी प्रवाशांची गैरसोय दूर करावी अन्यथा भारत राष्ट्र समिती तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात 'येईल असा इशाराही सौ.पाटील ह्यांनी दिला आहे.