आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांनी चोपडा आगाराचा राज्यात डंका.. आगार प्रमुखांचा आमदारांकडून कडुन सत्कार
चोपडा,दि.२९ ( प्रतिनिधी) राज्य परीवहन महामंडळा तर्फे राबविण्यात येत असलेल्या "हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत छ्त्रपती संभाजीनगर येथील समितीने भेट देवुन पाहणी केली,यात पहील्याच फेरीत महाराष्ट्रात ७७ गुण पटकवुन राज्यात दुसरा तर विभात प्रथम क्रमांक मिळवल्याने तालुक्याचे आमदार लताताई सोनवणे यांनी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, कैलास बाविस्कर,सागर ओतारी, राजेंद्र पाटील, प्रताप बारेला,गणेश पाटील,प्रकाश राजपुत, एक टी पवार, नितिन सोनवणे, परेश बोरसे,अनिल बाविस्कर आदी उपस्थीत होते.
आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी याप्रसंगी चोपडा आगाराला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाल्याचे श्रेय आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांचे असुन,दोन वर्षापुर्वी चोपडा आगाराची दुरावस्था झालेली असताना आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून निधी मंजुर करून बसस्थानक नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आल्याने तसेच.लोक सहभागने विविध सामाजिक संस्थांनी सहभाग व सहकार्य केल्याने बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलला.तसेच यापुढे देखील स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी आगाराच्या सुशोभीकरणासाठी व सोयी-सुविधा उपलब्ध करुन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार लताताई सोनवणे यांनी यावेळी दिली.आगार प्रशासन व कर्मचार्यांनी आ.लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे आभार मानले.