स्वातंत्र्य दिना निमित्त रोटरी व न .प . चोपडाच्या राष्ट्रभक्तीपर समूह गीत स्पर्धा उत्साहात संपन्न ! तिनही गटात प्र .वि .मंदिराचे सुयश ...

 स्वातंत्र्य दिना निमित्त रोटरी व न .प . चोपडाच्या राष्ट्रभक्तीपर समूह गीत स्पर्धा उत्साहात संपन्न ! तिनही गटात प्र .वि .मंदिराचे सुयश ...


चोपडा दि.१७( प्रतिनिधी)स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा  सांगता सोहळा देशभर जल्लोषात साजरा होत असतांना रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगर परिषद चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्र भक्ती पर समूह गीतांच्या स्पर्धांचे दरवर्षा प्रमाणे  आयोजन करण्यात आले होते . जवळपास २० संघानी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेचा शुभारंभ न . प . चोपडाचे उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे . चेतन टाटिया, मानद सचिव रोटे अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे .पंकज पाटील, सह प्रकल्प प्रमुख रोटे . चंद्रशेखर साखरे व स्पर्धा परिक्षक शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी, विजय पालिवाल सर, सौ .प्रीती गुजराथी यांच्या उपस्थितीत भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्पर्धेला सुरुवात झाली . यावेळी स्पर्धेचे प्रास्ताविक रोटे . चेतन टाटिया, सूत्रसंचालन रोटे . राधेश्याम पाटील सर तसेच सौ. प्रीती सरवैय्या - पाटील ( प्राचार्या - बालमोहन कनिष्ठ महाविद्यालय ) यांनी केले .

स्पर्धेच्या ३ गटांचे विजयी संघ खालील प्रमाणे ...

सत्यम गट ( इ . ५ वी ते ७वी ) 

प्रथम - प्रताप विद्या मंदिर

द्वितीय - पंकज ग्लोबल पब्लिक

तृतीय - पंकज विद्यालय

शिवम गट ( इ .८ वी ते १० वी )

प्रथम - प्रताप विद्या मंदिर

द्वितीय - पंकज माध्य. विद्यालय

विभागून तृतीय - महिला मंडळ माध्य. विद्यालय

तृतीय - विवेकानंद माध्य. विद्यालय

सुंदरम गट ( इ . ११ वी - १२ वी )

प्रथम - म गांधी कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय .

द्वितीय - महिला मंडळ कनिष्ठ महाविद्यालय

तृतीय - प्रताप विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय .

विजेत्या संघाना उपमुख्याधिकारी निलेश ठाकूर , रोटरी पदाधिकारी, परिक्षक व उपस्थित रोटेरियन व्ही . एस . पाटील, रोटे.विलास पी . पाटील, रोटे .चंद्रशेखर साखरे, रोटे .विपुल छाजेड ,रोटे. प्रदीप पाटील यां सदस्यांच्या हस्ते स्मृतिचिन्हं व सहभाग प्रमाण पत्र वितरित करण्यात आली .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने