चोपडा येथे बौद्ध महासभेने गुणवंताचा अभिनंदन व सत्कार कार्यक्रम संपन्न

 चोपडा येथे बौद्ध महासभेने गुणवंताचा अभिनंदन व सत्कार कार्यक्रम संपन्न



   चोपडा दि.२१(प्रतिनिधी)येथे दि.२०ऑगस्ट २०२३ रविवार रोजी दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल चोपडा  तालुक्याच्या वतीने वर्षावास कार्यक्रम निमित्त अभिनंदन व सत्काराचा कार्यक्रम समाज मंदिर गौतम नगर स्टेट बॅक समोर चोपडा येथे आयु.बापूराव गिरधर वाणे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या क्षेत्रात विशेष कामगिरी करून डॉक्टरेट पीएचडी प्राप्त शिक्षकांचा तसेच वैद्यकिय MBBS साठी निवड झालेल्याचा गौरव व सत्कार कार्यक्रम घेण्यांत आला. 

      यावेळी पीएचडी प्राप्त सत्कारमूर्ती आयु.प्रा.डॉ.रमाकांत बागुल,प्रा.डॉ.अरुण मोरे,प्रा.डॉ.दिलीप सपकाळे, डॉ. आधार पानपाटील,डॉ.संजय श्रीपत साळुंखे यांचा व एम.बी.बी.एस.वैद्यकिय शिक्षणासाठी डॉ.लिना संतोष अहिरे हिची निवड झाल्याने यांचा सन्मानपत्र,फुलगुच्छ देवून सत्कार करण्यांत आला. मान्यवरांनी सत्कारार्थी बाबत मनोगत व्यक्त केले.तसेच वर्षावास विषय बौद्ध धम्माची खास वैशिष्टये या विषयावर धम्मदेसना देण्यांत आली.

      कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा.आयु.अशोक बाविस्कर(नगरसेवक चोपडा)आयु.गोपाळराव सोनवणे(माजी उपसभापती पं.स.चोपडा)आयु.संतोषजिभाऊ अहिरे*(सामाजिक कार्यकर्ता चोपडा) आयु.हितेंद्र मोरे मुख्याध्यापक तथा जिल्हा संघटक भारतीय बौद्ध महासभा, संजय अहिरे,सचिन बाविस्कर बसपा हे उपस्थित होते.          सुत्रसंचलन भरत भिमराव शिरसाठ शहराध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले .

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी,संजय साळुंखे,सुदाम ईशी,देवानंद वाघ, जानकीराम सपकाळे,अरुण वाडे, संजय अहिरे,सचिन बाविस्कर,प्रविण करनकाळ यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या शेवटी आभार देवानंद वाघ यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने