भडगाव येथे महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची १३१ वी जयंती साजरी
भडगाव दि.१९(प्रतिनिधी)सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख, महाविद्यालय भडगाव येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस आर रंगनाथन यांची १३१ वी जयंती प्रतिमा पुजन करून साजरी करण्यात आली.
याप्रसंगी ग्रंथपाल रचना गजभिये यांच्याद्वारे तयार केलेले विविध विषयावरील QR Code चे उद्घाटन माननीय प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ.संजय भैसे होते. तसेच वाणिज्य विभागातील प्रा. एस ए कोळी यांनी ग्रंथालय विभागाला वाणिज्य विषयाचे मासिक सभासदत्व आजीवन ग्रंथालय विभागाला देण्याची घोषणा केली. महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ एस. डी.भैसे आणि डॉ चित्रा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य यांनी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व वाचाल तर वाचाल तर यशश्री मिळवाल असा संदेश दिला. सूत्रसंचालन ग्रंथपाल रचना गजभिये,तर आभार प्रा.शिवाजी पाटील यानी मानले.यावेळी उपस्थितीत प्रा.डॉ सचिन हडोळतीकर, डॉ गजानन चौधरी, डॉ.जनार्दन देवरे,डॉ इंदिरालोखंडे प्रा.ज्योती नन्नवरे प्रा.एस.ए.कोळी प्रा. स्नेहा गायकवाड, राजू मराठे तसेच माजी विदयाथी सुरेश भंडारी,सुनील कासार इ.होते.