ढंढाणे गावातील महादेव मंदिरास शेषनाग व पंचारती भेट.. चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात व पत्रकार आत्माराम पाटलांनी दिली मदत

ढंढाणे गावातील महादेव मंदिरास  शेषनाग व पंचारती भेट.. चोपडा वनक्षेत्रपाल बी.के.थोरात व पत्रकार आत्माराम पाटलांनी दिली मदत

 चोपडा दि.२१(प्रतिनिधी)  :- ढंढाणे ता. जि. धुळे येथे उद्या सोमवारी महादेव मंदिरात महादेवाची पिंडाची प्राणप्रतिष्ठा होणार असून.  संध्याकाळी ४ वाजता महादेवाची पिंडाची वाजतगाजत भव्य मिरवणूक निघणार आहे. दरम्यान चोपडा वन विभागाचे वनक्षेत्रपाल बी. के. थोरात साहेबांनी तांब्याच्या शेषनाग मणी व चोपडा तालुक्यातील पत्रकार आत्माराम पाटील यांनी  पितळाची पंचाआरती भेट  दिली आहे. ढंढाणे येथील उपसरपंच प्रविण पाटील व सामाजिक कार्यकर्ते योगेश जयराम पाटील यांच्या कडे  सोनगीर येथे सुपूर्द करण्यात आली. दोन्ही दात्यांचे  सरपंच ज्ञानज्योती भदाणे, उपसरपंच प्रविण अहिरे, सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि विशेषतः ढंढाणे गावातील नागरिकांनी आभार मानले. 

  वनक्षेत्रपाल बी .के. थोरात  हे देखील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांनी आपल्याच जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन फुल नाही फुलाची पाकडी म्हणून योगदान दिले आहे. आज सकाळी महादेवाची पिंडाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरि सर्व भाविकांची याचा लाभ घ्यावा. असे आवाहन ढंढाणे गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने