पाड्यात वस्ती दुर्गम भागातील १६ गावात ४८१.८८ लक्ष रूपयांच्या विकास कामांचा श्रीगणेशा.. आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या नावाचा जयघोष करीत आदिवासी लागले नाचू..

 पाड्यात वस्ती दुर्गम भागातील १६ गावात ४८१.८८ लक्ष रूपयांच्या विकास कामांचा श्रीगणेशा.. आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या नावाचा जयघोष करीत  आदिवासी लागले नाचू..



 चोपडा दि.२(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. लताताई सोनवणे   व माजी प्रा. अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे  यांच्या अथक प्रयत्नांनी  आदिवासी भागात अमुलाग्र बदल होत असून वायु वेगाने विकास कामांचा सपाटा सुरू आहे.जवळपास १६ गावात ४८१.८८ लक्ष रुपयांच्या  पाणी पुरवठा योजना कामांचा श्रीगणेशा झाला असल्याने आदिवासी बांधव अक्षरक्ष: नाचू लागले आहेत.पाऊसाने जरी पाठ फिरवली आहे मात्र आमदारांनी आमच्याकडे पाठ फिवलेली नाही.नाल्या डबक्याच्या पाण्याची सवय झालेल्या आमच्या दरिद्री जीवनात आता पाणी नशिबी आले आहे .खरच मागासलेला, अविकसित गरजवंताच्या जीवनात विकास ज्योत बनून आलेल्या देव माणूस आमदार सोनवणे दाम्पत्यास हजार वेळा पाया पडाव्या तितक्याही कमीच  आहेत. आताही तेच पुढेही तेच आमचे दैवत राहतील अशा हृदय स्पर्शी भावना आदिवासी बंधू भगिनींनी व्यक्त केल्या आहेत. ते नुकतात्याच झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या उद्घाटनप्रसंगी भावनाधिन होऊन बोलत होते.

 आमदार सौ. लताताई सोनवणे   व माजी आमदार प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे   यांच्या अथक प्रयत्नांनी आमदार निधितुन करोडो रुपयांचा निधी आणुन  पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे आदिवासी भागात ७० वर्षात कुणीही केलेले नव्हते ते काम आमदार दाम्पत्यांनी केल्याने  आदिवासी बांधवाचा आनंद गगनात मावत नव्हता.२०२४ ला  आम्हाला हेच आमदार हवे हवेतं 

अश्या बोलक्या प्रक्रिया दिखिल त्यांनी   दिल्या.

काल दि.१/७/२०२३ रोजी

 सत्रासेन,मोरचिडा,अमलवाडी, उमर्टी,गौऱ्यापाडा,खाऱ्यापाडा,  वैजापूर,मुळ्यवतार,शेनपाणी,कर्जाणे,मेलाणे,जिरायतपाडा, देवगड,देव्हारी,देवझिरी,बोरमळी,ह्या सर्व आदिवासी पाड्यांना ४८१.८८ लक्ष रुपयांचा विकासकामांचे भूमिपूजन उद्घाटन आमदार सौ लताताई सोनवणे   व माजी आमदार प्रा अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे  चोपडा यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी  ते मत व्यक्त करीत होते.  याप्रसंगी राजेंद्र गंगाधर पाटील,आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ  ,आदिवासी विकास सदस्य प्रताप पावरा ,  , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील,संचालक वसंत रावसाहेब पाटील,संचालक विजय पाटील,संचालक किरण देवराज, मा राजेंद्र पाटील,सुकलाल कोळी,विकास पाटील,दिपक चौधरी,किरण करंदीकर,संदीप कोळी,किरण पाटील,भाऊसाहेब गणपूरकर, सौ सुनंदा पाटील, कैलास बाविस्कर,

दत्तरसिंग पावरा सरपंच वैजापूर,सौ लालबाई पावरा सरपंच मेलाणे, प्रल्हादभाऊ पाडवी सरपंच देव्हारी, दिलिप पावरा उपसरपंच मेलाणे, अन्नु ठाकुर,अनिल पावरा ग्रा प सदस्य, सौ महरीबाई पावरा ग्रा प सदस्य,बबलु बारेला,रुमसिंग बारेला,भिकन बारेला,सतिष बारेला सरपंच कर्जाणे,जतनसिग बारेला, राहुल बारेला,प्रकाश पाडवी, ताराचंद पाडवी यांचे सह शेकडो आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने