दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप.. नगरसेवक समाधान सरवणकर यांनी दिला मदतीचा हात
मुंबई दि.३(प्रतिनिधी) सावली सहयोग संस्थेच्या प्रयत्नाने नगरसेवक श्री.समाधान सरवणकर यांच्या अनमोल सहकार्याने दि.२/७/२३ रोजी सायं.०७ वा.विभागातील दिव्यांग गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री.रमेश वर्धावेली यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात भार लागावा ही जाण ठेऊन नगरसेवक सरवणकर यांनी मदतीचा हात दिला. याप्रसंगी श्री .एकनाथ संगम (सचिव भाजपा) ,श्री.सागर गांगुर्डे (उद्योजक), श्री.मुलनिवासी माला (पत्रकार) तेव्हा संस्थेचे अध्यक्ष श्री .राजेश घोलप ,सचिव श्री.विशाल ताम्हणकर, खजिनदार श्रीम.पुजा सावंत आदी गणमान्य उपस्थित होते.