महावीर नगरातील सुरेश पाठक दाम्पत्याची पायी वारी यशस्वी.. विठूरायाच्या मुखदर्शनाने आनंद गगनाला
चोपडा दि.२(प्रतिनिधी): महावीर नगरातील रहिवासी मन मिळाऊ स्वभावाचे शांततापिर्य अन् परमार्थिक विचारसरणीचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.सुरेशजी पाठक व सौ.पाठक ह्या दाम्पत्याने यंदा चोपड्याहून पायी चालत पंढरपूर गाठून भगवान पांडुरंग विठोबा रायाचे दर्शन घेतले आहे. अनेक वर्षांपासूनची इच्छा प्रत्यक्षात साकार झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे . वयाच्या सत्तरी पार केल्यानंतर हा पायी वारी पूर्ण केल्याने परिसरातून त्यांच्यावरच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यासंदर्भात त्यांनी म्हटले की, आज जीवनातील सर्वात महत्वाचे ध्येय सफल झाले.ते म्हणजे पायीवारी करून नेमकेच एकादशीच्या तिथीलाच पांडुरंगाचे मुखदर्शन आणि योगायोग प्रत्यक्ष पदचरण दर्शन झाल्यानेआमची वारी सफल झाली.सकाळी --07:15 वाजता मुखदर्शन व -08:55 ला पदचरणस्पर्श दर्शन झाले.लाईव्ह दर्शनापेक्षा प्रत्यक्ष दर्शनाचे आत्मिक समाधान हे वेगळच असल्याचा प्रत्यय पाठक दाम्पत्यास आला. विठू माउली दर्शनाचा दूर्मिळ योग आल्याबद्दल पाठक दाम्पत्याचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेश शिरसाठ, प्रकाश चौधरी, सर्कल रविंद्र माळी, श्री.राठीसर,अनिल बडगुजर,श्री.देवांगसर, संदीप सावळेसर, गोपाल मराठे, फुलचंद चौधरी, किशोर बडगुजर, राजेंद्र बडगुजर, प्रमोद पाटीलसर, सोपान मराठे,रतिलाल बडगुजर, डॉ.रविंद्र भवराळे, मोतीलाल महाजन,भारत राजपुत, रोहीत सोनार,सुमित सोनार, प्रा.पियुष चव्हाण, आकाश मराठे,रितेश पाटील, योगेश मराठे,कैलास पाटील, दिनेश मासरे, रणछोड लोहार, महेश पाटील, भावेश सोनवणे , दीपक तायडे, प्रा.चंद्रकांत देवरे, रामसिंग पाटील, अशोक हिरालाल बडगुजर, रमेश बडगुजर, गणेश सोनार,धनराज पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.