आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून हातेड प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन अत्याधुनिक रुग्ण वाहिका लोकार्पण ..
चोपडा दि.२(प्रतिनिधी)तालुक्यातील हातेड प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने आदिवासी भागातील रुग्णांचा जिकिरीचा प्रश्न सुटला .या नवीन रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा काल रोजी आ.सौ.लताताई सोनवणे व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते झाला.हातेड केंद्रात ना दुरुस्त वाहिका वारंवार बंद पडते हे आमदारांनी लक्षात घेत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या लक्षात आणून दिले असता जिल्हा नियोजन विभागातून निधी मंजूर होऊन अत्याधुनिक रुग्ण वाहिका प्राप्त झाली आहे.
या लोकार्पण सोहळ्यास कृउबा समिति सभापती नरेंद्रभाऊ पाटील, संचालक गोपाल पाटील ,विजय पाटील किरणभाऊ देवराज ,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. लासुरकर ,सुकलाल कोळी, विकास पाटील , राजेंद्र जैस्वाल ,राजेद्रजी पाटील, दिपक चौधरी, कैलास बाविस्कर, मनोज पाटील, संदीप कोळी,सौ सुंनदाताई पाटील ,ईश्वर पाटील , किरण कंरदीकर आदी मान्यवर उपस्थित होते .