मंत्री ना.अनिल पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण.. मुंबईचे कामकाज बघायला येण्याचे केले आवाहन
चोपडा,दि.२४ (प्रतिनिधी ) -- चोपड्या तालुक्यातील वेले हे माझ्या आजोळचे गाव होय येथील सर्व घरातल्या महिलांनी मला लहानपणी प्रेम दिले आहे घराच्या पती परमेश्वरापेक्षा भाचा हा देव असतो या उद्देशाने मला लहानपणी प्रत्येक घरातल्या माम्यांनी भरपूर प्रेम दिले व माझ्यावर उपकारच केले आहेत यांचे उपकाराची परतफेड मी करू शकत नसलो तरी तुमच्या भाच्या आज मुंबईला कसे काम करतो हे पाहण्यासाठी गावातील सर्व महिलांनी मुंबईला एक वेळेस यावे लागल्यास त्यासाठी मी खर्च करीन अशी भावनिक हाक वेल्या गावातील महिलांना नामदार पाटील यांनी दिली
नामदार अनिल पाटील हे उपमुख्यमंत्री व त्यांचे निकटवर्तीय अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथील अजित पवार गटाने घनश्याम भाऊ मित्र मंडळ व शिव कृपा कॉटन स्पिन यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यात 25000 झाड लावण्याचा संकल्प संकल्प यांनी केलेला होता या कार्यक्रमाचे नामदार अनिल पाटील यांच्या हस्ते व ते जे गावात लहानपणी शिकलेत त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा अजित दादा पवार या गटाची होती व वेले गावातील ग्रामस्थांची सुद्धा होती नामदार अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच चोपडा तालुक्यात आल्याने सर्वत्र आनंद होत होता त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या आईचे सत्कार मोठ्या प्रमाणात ठेवायच्या होता परंतु इरशाळवाडीच्या दुर्घटनेमुळे नामदार अनिल पाटील यांनी सत्कार वाजंत्री बॅनर याबाबत अजिबात नकार दिलेला होता त्यामुळे वेले गावातील नागरिकांच्या हिरमोड झाला होता. तरीही आपला गावाच्या भाचा मंत्री म्हणून येत आहे त्यामुळे गावातील मंडळी मोठ्या प्रमाणात विठ्ठल मंदिरात जमली होती यावेळी अनेक जुन्या आठवणी नामदार पाटील सांगत असताना त्यांनी गावातील सर्व मला सांभाळलेल्या मामीना भावनिक हा करत सांगितले की आपण मुंबईत आपला भाचा कसा काम करतो हे पाहण्यासाठी प्रत्यक्षात एक वेळेस या यासाठी लागणारा सर्व खर्च मी करेन गाडी सुद्धा मी करून देईन तिथे राहण्या खाण्याची व्यवस्था सुद्धा मी करील परंतु आपण दिवसभर शेतात जात असतात तर एक वेळेस आपण मुंबई पहावे अशी माझी इच्छा आहे मला लहानपणी दिलेल्या प्रेमाची परत फेड शकत नाही परंतु एक वेळेस आपण मुंबई आल्या आला तर मीही आपणासाठी थोडं काही करू शकलो असं माझ्या मनात कायमस्वरूपी राहील यावेळी सर्व महिलांनी होकार दिला व काही महिलांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले त्या सर्व महिला गहिवरून गेल्या व एवढी जुनी आठवण आजही मंत्री झाल्यावर आहे अशी काही महिलांनी बोलून दाखवले