चोपडा तालुका व्यापाऱ्यांचा बुलंद आवाज श्री.अमृतभाई सचदेव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत २६ रोजी ..व्यापारी महामंडळाचा पद ग्रहण सोहळा

 चोपडा तालुका व्यापाऱ्यांचा बुलंद आवाज श्री.अमृतभाई सचदेव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत २६ रोजी ..व्यापारी महामंडळाचा  पद ग्रहण सोहळा



चोपडा दि.२३(प्रतिनिधी): 
 तालुक्यातील व्यापाऱ्यांचा बुलंद आवाज,परखड व निडर नेतृत्व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष श्री. अमृतभाई सचदेव यांच्या ६२ व्या वाढदिवस अभिष्टचिंतनाचे औचित्य  चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचा पदाधिकारी व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा दि .२६ जुलै २०२३, बुधवार रोजी  सायं. ७.०० वा. संस्कार मंडपम्, जुना शिरपुर रोड, चोपडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मान्यवरांचा सत्कार  व पदग्रहण माजी आमदार व उद्योगपती मनिषजी जैन   यांच्या शुभहस्ते होणार असून
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान
ॲड. भैय्यासोा. श्री. संदिप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) हे भूषविणार आहेत.यावेळी
प्रमुख पाहुणे श्री. वसंतलाल गुजराथी (उद्योजक चोपडा),
श्री. डॉ. विकास हरताळकर (वैद्यकीय सम्राट),श्री. प्रा.शांतीलाल बोथरा (संस्थापक चेअरमन महावीर पत संस्था),
श्री. विजयकुमार अग्रवाल(माजी अध्यक्ष, व्यापारी महामंडळ चोपडा), श्री. राजाराम पाटील (संचालक, महाविर पतसंस्था),श्री. भाऊसाहेब थोरात (तहसिलदार चोपडा), श्री.के.के. पाटील (पी.आय. शहर पोलीस स्टेशन चोपडा),श्री. माणकलाल चोपडा (माजी संघपती जैन समाज चोपडा),श्री. चंदुलाल पालीवाल (मार्गदर्शक व्यापारी महामंडळ) हे उपस्थित राहणार आहेत.
तरी कार्यक्रमास व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
महामंडळाचे
सुनिल भिकमचंद बरडिया, दिपक धरमचंद राखेचा, प्रविण गौतमचंद राखेचा सर्व उपाध्यक्ष, सल्लागार, पदाधिकारी, प्रसिध्दी प्रमुख व संचालकांनी  केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने