चोपड्यात ताराचंद हरसाय अग्रवाल व गर्ग परिवारातर्फे दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन..
चोपडा दि.२४(प्रतिनिधी): पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वावर गुरुदेव श्री.श्री.१००८पद्मविभूषित नारायणदास जी महाराज (त्रिवेणी धाम),व श्री.श्री.१००८श्री.महामंडलेश्वर प.पू.संत बालयोगीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ताराचंद हरसाय अग्रवाल व गर्ग परिवार, चोपडा-विरवाडा यांच्यावतीने चोपड्यात लक्ष्मी जिनींग अॅण्ड प्रेसिंग आडगांव-विरवाडे रोड, येथे सप्त दिवशीय दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कथा वाचक श्रीधाम मिथीलावासी भागवताचार्य गोवत्स श्रध्देय राजीवकृष्णाजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीने होणार आहे .
या श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ मंगलवार दि.०१ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी होणार असून ७ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालणार आहे याच शेवटच्या दिवशी पूर्णाहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम सकाळी ९ते १वाजे दरम्यान होणार आहे . तसेच प्रतिदिन दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संगीतमय कथा होणार आहे
कार्यक्रमाची रुपरेषा अशी,
दिनांक ०१/०८/२०२३
मंगळवाररोजी *भागवत महात्म्य* ,
०२/०८/२०२३बुधवाररोजी
*सुखदेव परिक्षीत चरित्र संवाद* ,
०३/०८/२०२३ गुरुवाररोजी
*ध्रुव चरित्र, कपिल उपारव्यम* ,
०४/०८/२०२३शुक्रवाररोजी
*श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म उत्सव* ,०५/०८/२०२३ शनिवारी
*माखन चोरी, गोवर्धन पुजा* ,
०६/०८/२०२३ रविवाररोजी
*रुख्मीनी स्वयंवर महा रासलीला* ,
०७/०८/२०२३सोमवाररोजी
*सुदामा चरित्र, परिक्षीत मोक्ष व पुर्णाहुती*
तरी भागवत सप्ताहाचा लाभ भाविकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .