चोपडयाच्या कुख्यात गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी MPDA कायदान्वये स्थानबध्द
चोपडा,दि.१(प्रतिनिधी) : कुविख्यात गुन्हेगार वैभव उर्फ टकल्या गोपाळ गवळी (28, बारीवाडा, चोपडा) यास ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. टकल्या गवळीविरोधात खून, जबरी चोरी, शरीराविरोधात दुखापत यासह गंभीर गुन्हे दाखल होते शिवाय त्यास सहा महिन्यांसाठी हद्दपारही करण्यात आले मात्र वर्तवणुकीत सुधारणा होत नसल्याने निरीक्षक के. के. पाटील यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत आदेश पारीत केले. संशयिताची ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. या कारवाईचा गुन्हेगारी वर्तुळाने मोठा धसका घेतला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,वैभव उर्फ टकल्या गोपाल गवळी व 28 रा बारीवाडा चोपडा याचे विरुध्द चोपड़ा शहर पोलीस स्टेशनला खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतास नोव्हेंबर 2022 मध्ये 6 महिन्याकरीता जळगांव जिल्हयातुन हदपार करण्यात आलेले होते हद्दपार कालावधीमध्ये देखील सदर आरोपीने हद्दपार आदेशाचे उल्लघन करून चोपड़ा शहरामध्ये प्रवेश करुन चोपडा शहरात खंडणी व गंभीर दुखापतीचा शरीराविरुध्दचा गुन्हा केलेला आहे आगामी काळात होणा-या निवडणुका व विविध जाती धर्माचे सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या इसमांचे विरुध्द कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश मा श्री एम. राजकुमार साहेब पोलीस अधिक्षक जळगांव यांनी जळगांव जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत.
श्री एम राजकुमार ( पोलीस अधिक्षक जळगांव) यांच्या आदेशान्वये व श्री रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव परिमंडळ व श्री कृषिकेश रावले सहा पोलीस अधिक्षक उपविभाग चोपडा भाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, सफो सुनिल पाटील, पोहेकॉ / प्रदीप राजपुत, पोहेकॉ/विलेश सोनवणे, पोकों/रविद्र पाटील, अशांनी वर नमुद इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादाक व्यक्ती, दृकशाव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 सुधारणा अधिनियम 1996, 2009 व 2015 चे कलम 3 (1) नुसार स्थानवाद करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक सो जळगांव यांच्या मार्फत जिल्हादंडाधिकारी जळगांव यांना सादर करण्यात आलेला होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किसन नजन पाटील व त्यांचे सहकारी पोहेकॉ दामोदरे यांनी तात्काळ पुढील कारवाई करून सदर प्रस्तावावरुन दिनांक 31/05/2023 रोजी जिल्हाधिकारी जळगांव यांनी वर नमुद इसमास स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश काढल्याने सदर इसमास आज दिनांक 01/06/2023 रोजी सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोना/संतोष पारधी, पोका विजय बच्छाव यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे दाखल स्थानबध्द केलेले आहे.
ज्या आरोपीतांचे विरुध्द गंभीर स्वरुपाचे शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत व वेळावेळी कायदेशिर कारवाई करून तसेच कठोर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे वर्तनुकीत सुधारणा होत नाही व ते वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत. अशा धोकादायक व जास्तीतजास्त सराईत गुन्हेगाराविरुध्द मोका तसंच MPDA या कायदयान्यये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पोनि के.के.पाटील यांनी कळविले आहे.