जयहिंद क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संजीव शिरसाठ यांची नियुक्ती

जयहिंद क्रांती संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संजीव शिरसाठ यांची नियुक्ती

चोपडा दि.२(प्रतिनिधी) सामाजिक व आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदिवासी सेवक श्री संजीव पांडूरंग शिरसाठ सामाजिक दायित्व पाहून जय हिंद क्रांती सेवा मिशन राष्ट्रीय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसे नियुक्ती पत्र राष्ट्रीय आरोग्य व पर्यावरण मंत्री डॉ.ए.बी.मोहिते दादासाहेब यांनी दिले.
संजीव शिरसाठ यांचे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून  जय हिंद क्रांती सेवा मिशन राष्ट्रीय संघटन कडुन  ही नियुक्ती करण्यात आली असून पदाचा कालावधी २०२३ पासून ते २०२६ पर्यंत राहणार आहे.
आपण बुध्दीकौशल्य व लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा, जनहित, राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढ, निकोप संवर्धन व संघटनेचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे  हि संघटना राष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार, अन्याय, सामाजिक शोषण,बोगस राजनिती , महिला व मुलांची तस्करी, याविरुद्ध आवाज उठविण्यात अग्रेसर असून एक क्रांती निर्माण करीत आहे.
उपरोक्त निवडीबद्दल संजीव शिरसाठ यांचे आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे, माजी उप महापौर डॉ.आश्विनभाऊ सोनवणे, पत्रकार महेश शिरसाठ, कृऊबा सदस्य किरण देवराज, प्रताप पावरा,दत्तसिंग पावरा, प्रल्हाद पाडवी, दिलिप पावरा,भुषण पाटील,नानाभाऊ पाटील,पी आर माळी, कैलास बाविस्कर, चंद्रशेखर साळूंके, प्रविण कोळी, गणदास बारेला,सौ नायजाबाई पावरा,देवसिंग पावरा,माला   पावरा,यासु बारेला,रुपसिंग पावरा, दिनेश बारेला,संजय बारेला,सागर पावरा, सौ नानीबाई पावरा, सौ नर्साबाई पावरा आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने